ठळक बातम्या

शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सामूहिक बलात्कार

औरंगाबाद – जिल्ह्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीतून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी या वस्तीची केवळ लूटच केली नाही, तर दोन महिलांवर बलात्कार केल्याचीही माहिती हाती आली आहे. या घटनेमुळे औरंगाबादमधील पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याला हादरा बसला आहे.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांनी येथील वस्तीची लूट केली, तसेच येथील दोन महिलांवर सामूहिक बलात्कारदेखील केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

 

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *