ठळक बातम्या

शेतकरी आंदोलनातील नेत्याने स्थापन केला नवा राजकीय पक्ष

नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर शेतकºयांच्या आंदोलनातील नेते आणि भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंग चदुनी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चदुनी यांनी संयुक्त संघर्ष पार्टी या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचा हा नवा राजकीय पक्ष आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ११७ जागा लढणार आहे. असे असले, तरी ते स्वत: पंजाब विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुरनाम सिंग चदुनी म्हणाले, राजकारण भ्रष्ट झाले आहे. हे बदलायला हवे. आमचा उद्देश राजकारणाची शुद्धता करणे आणि चांगल्या लोकांना पुढे आणणे हा आहे. सध्याचे राजकीय नेते भांडवलदारांना प्रोत्साहन देत आहेत आणि भांडवलदारांच्या हिताचीच धोरणे तयार करतात. यावेळी ते गरिबांच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आम्ही या पक्षाची घोषणा करत आहोत. संयुक्त संघर्ष पार्टी एक धर्मनिरपेक्ष पक्ष असेल. हा पक्ष समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी काम करेन.

गुरनाम सिंग चदुनी हे वर्षभरापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणात लोकांना एकत्र करण्यात मोठी भूमिका निभावली होती. या शेतकरी आंदोलनाला यश येऊन नोव्हेंबरमध्ये हे कृषी कायदे मागे घेण्यात आले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: dating sites