ठळक बातम्या

शुभमन गिल ठरला मुकद्दर का सिकंदर!

कानपूर – भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रामध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. या कसोटीमध्ये टीम इंडियाचा शुभमन गिल याने झळकावलेले अर्धशतक हे पहिल्या सेशनच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या गिलला नशिबानेही चांगली साथ दिली. शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल ही जोडी टीम इंडियाकडून मैदानात उतरली. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाची ओपनिंग रोहित आणि राहुल जोडीने केली होती. यापैकी रोहित शर्माला या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे, तर केएल राहुल दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यामुळे गिल आणि मयांक ही नवी जोडी ओपनिंगसाठी मैदानात उतरली. गिल-मयांक जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. मयांक अग्रवाल १३ धावा काढून बाद झाला. त्याला कायले जेमिसनने बाद केले. मयांक बाद झाल्यानंतर शुभमन गिलची चेतेश्वर पुजारासोबत जोडी जमली. सुरुवातीला शांत खेळणाऱ्या गिलने जम बसल्यानंतर फटकेबाजी करीत न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकलले. गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीमधील चौथे अर्धशतक ८१ चेंडूंमध्ये पूर्ण केले. यामध्ये त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. ऑस्ट्रेलियामधील टेस्ट सीरिजमधील ऐतिहासिक विजयात गिलचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याला इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. या दुखापतीनंतर पहिल्यांदाच टीम इंडियाकडून गिल खेळत आहे.शुभमन गिलला पहिल्या दिवशी नशिबाची साथ देखील मिळाली. शुभमन गिल शून्यावर होता तेव्हाच टीम साऊथीच्या चेंडूवर त्याला पंचांनी बाद दिले. पण, गिलने तात्काळ डीआरएस घेतला. त्यावेळी चेंडू बॅटला लागल्याचे आढळले आणि गिल बचावला. इतकेच नाही तर एजाज पटेलने टाकलेल्या सातव्या ओव्हरमध्ये गिल एलबीडब्ल्यू झाला होता, पण त्यावेळी न्यूझीलंडचा क र्णधार केन विलियमसनने रिव्ह्यू घेतला नाही. त्याचा फायदाही गिलला मिळाला आणि त्याने अर्धशतक झळकावले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …