शिवसेना-भाजपला एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू – विक्रम गोखले

पुणे – ज्या संकटाच्या काळावर आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचे असेल, तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यायलाच पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे आणि या दोन पक्षांना एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
७५व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्या कारणांसाठी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला, ज्या कारणांसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात केली. ज्याचा मराठी माणसाला एक आधार वाटला, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला आज किती यातना होत असतील याची कल्पना फक्त जे बाहेर राहून बघताहेत, त्यांनाच होऊ शकते. त्यातला मी एक आहे. बाळासाहेबांची भाषणे ऐकून ४० वर्षे महाराष्ट्र तृप्त झाला. त्यांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ चालले आहे. ते इतके विचित्र स्तरावर चालले आहे की, त्यात महाराष्ट्राचा माणूस हा भरडला जात आहे. लोक अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकाचे हे म्हणणे आहे की, हे गणित चुकले आहे. हे गणित सुधारायचे असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही, म्हणूनच शिवसेना आणि भाजप यांना एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे विक्रम गोखले यांनी स्पष्ट सांगितले. तसेच, ज्यांच्याकडे फॉलोअर्स असतील, त्यांनी शिवसेना आणि भाजप आघाडीबाबत पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

—————————————
ही एकट्या फडणवीसांची चूक नाही

शिवसेना-भाजप युतीबाबत मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारले आहेत. त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर तुमचं तरी काय बिघडलं असतं?, असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. त्यावर त्यांनी झाली चूक असं मान्य केलं आहे, असा दावा गोखले यांनी केला आहे. खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाबण्याने बांधून घेत नाही. त्यामुळेच मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधील नाहीये. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारून देतो, असंही गोखले यांनी म्हटलं आहे.
————————————————–

कंगनाच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याशी सहमत
अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे. भारताला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असं कंगना राणावत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. असे असताना कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केले. कंगना राणावतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले, खरंय, कंगना राणावत जे म्हणालेली आहे ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे, यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते, असे विक्रम गोखले म्हणाले.

—————————————-
राजकीय लोकांनी एसटीची वाट लावली

मी एकेकाळचा एसटी मंहामंडळाचा ब्रँड ॲबेसिडर आहे. एसटी, एअर इंडियाला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केलं आहे. एसटी घरोघरी-दारोदारी जाणारी आहे. एसटी मंहामंडळाकडे १८ हजार बसेस आहेत. जगात एसटी नंबर १ आहे. इतकं मोठं जाळं विणलंय एसटीने. त्याची आता वाट लावली, अशी टीका विक्रम गोखलेंनी केली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …