शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीचा छापा

जालना – शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानेशुक्रवारी सकाळी धाड टाकली. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्येईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. १२ जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईडीच्या अधिकाºयांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापेमारलेहोते. त्यानंतर भाजपचेनेतेकिरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही छापेमारी सुरु झाली आहे.
शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळीच साडेआठ वाजल्यापासून ईडीचेपथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. १२ जणांच्या या पथकानेघराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली आहे. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. यापूर्वी खोतकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत, मालक नाही, असं स्पष्टीकरण खोतकरांनी दिलं होतं.
अर्जून खोतकर हे सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचेसभापती आहेत. त्यामुळे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचीही ईडीकडून तपासणी करण्यात आली. जालन्यात आज सकाळीच या दोन ठिकाणी सक्तवसुली संचलनालयातर्फेधाडी टाकण्यात आल्यानेशहरात एकच खळबळ माजली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …