शिवभोजन केंद्राचे अनुदान अनेक महिन्यांपासून अडकले

  • ठाकरे सरकारची योजना बंद पडणार?

चंद्रपूर – राज्यातील शिवभोजन केंद्र संचालक अडचणीत आले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते, मात्र हळूहळू यातील अनुदान बंद होत गेल्याने संचालकांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना राज्यात सरकार आहे का?, असा प्रश्न विचारला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत. गाजावाजा करून सुरू केलेली ही योजना अनुदान मिळत नसल्याने सुरू ठेवण्यास केंद्र संचालकांनी असमर्थता दर्शविली आहे. तातडीने यावर उपाय न शोधल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण होणार आहे. राज्यातील शिवभोजन केंद्र संचालक सध्या अडचणीत सापडले आहेत. गेले पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले आहे. चंद्रपूरसह राज्यभरात हीच स्थिती आहे. सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे आहेत. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते, मात्र आधी १५ दिवसांनी मिळणारे अनुदान नंतर महिना, ५ महिन्यांवर गेले आहे. ही योजना बंदच पडणार होती. कारण शेतकरी-विद्यार्थी आणि राज्यातील सर्वच घटकांना या सरकारने कुठलाही दिलासा दिलेला नाही. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर टीका करताना राज्यात सरकार आहे का?, असा प्रश्न विचारला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …