ठळक बातम्या

शिवनेरकार वाबळे स्मृती क्रिकेट : कस्तुरबासमोर ग्लोबल हॉस्पिटलचे आव्हान

मुंबई – आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमी, शिवनेर व आयडियल ग्रुप आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल ‘बी’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेचा कस्तुरबा हॉस्पिटल विरुद्ध ग्लोबल हॉस्पिटल यामधील अंतिम लढत २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. शिवाजी पार्क मैदानात रंगतदार होईल. स्पर्धेमध्ये दोनदा सामनावीर पुरस्कार पटकाविणारा डॉ. परमेश्वर मुंडे यांचा अष्टपैलू खेळ कस्तुरबा हॉस्पिटलसाठी मोठी जमेची बाजू असेल. ‘ए’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविण्यासाठी बलाढ्य नानावटी हॉस्पिटल विरुद्ध हिंदूजा हॉस्पिटल यामध्ये अंतिम फेरीदेखील चुरशीची होणार आहे.

अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंडे यांच्यासह रोहन ख्रिस्टीयन, मंगेश आगे, सुदर्शन कुट्टी आदी कस्तुरबा हॉस्पिटलच्या खेळाडूंनी सायन हॉस्पिटलच्या अंतिम फेरी प्रवेशाचे स्वप्न शेवटच्या चेंडूवर उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे निर्णायक क्षणापर्यंत जिंकण्याची ईषा कस्तुरबा संघ राखून आहे. अष्टपैलू निलेश देशमुख, कपिल गमरे, सुनील कदम, आशिष जाधव, संतोष साळुंखे आदी खेळाडू विशेष फॉर्ममध्ये असल्यामुळे ग्लोबल हॉस्पिटलचे त्यांना तगडे आव्हान असेल. परिणामी विजेतेपदाचे पारडे दोलायमान राहील. ‘ए’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविण्यासाठी होणाऱ्या अंतिम सामन्यामधील नानावटी वि. हिंदूजा हॉस्पिटल हे दोन्ही संघ दर्जेदार असून समतोल आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना अटीतटीची लढत पाहण्यास मिळेल. अंतिम फेरी व बक्षीस समारंभप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, जेजे हॉस्पिटलचे सुपरीटेंड व क्रिकेटपटू डॉ. संजय सुरासे, सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुपरीटेंड व क्रिकेटपटू डॉ. आकाश खोब्रागडे, टाटा हॉस्पिटलचे सलामीवीर क्रिकेटपटू डॉ. शैलेश श्रीखंडे, केईएम हॉस्पिटलचे सलामीवीर क्रिकेटपटू डॉ. आदिल छगला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेला आत्माराम मोरे प्रतिष्ठान, आरएमएमएस यांचे सहकार्य लाभले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: Web Hosting