मुंबई – सलामीवीर भूषण वैद्य, विशाल पाटील यांची दमदार फलंदाजी व जितेंद्र परदेशीचा अष्टपैलू खेळ यामुळे हिंदुजा हॉस्पिटलने बलाढ्य नानावटी हॉस्पिटलचा ६ गडी राखून पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमी, शिवनेर व आयडियल ग्रुप आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजचा पुरस्कार जितेंद्र परदेशीने, उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार प्रफुल तांबेने, तर सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार नंदकुमार पाटीलने मिळविला. सलामीवीर दिनेश पवार (१५ चेंडंूत २३ धावा, १ षटकार), किशोर कुवेस्कर (११ चेंडंूत १७ धावा, २ चौकार) व प्रफुल तांबे (१८ चेंडंूत २७ धावा, २ चौकार) यांच्या २ बाद ७० धावा अशा आक्रमक प्रारंभानंतरही नानावटी हॉस्पिटल संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव २० षटकांत ७ बाद १२७ धावसंख्येवर संपुष्टात आणताना हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशांत हिरोजी (७ धावांत १ बळी) व जितेंद्र परदेशी (१२ धावांत २ बळी) यांनी ४ षटकांची किफायतशीर गोलंदाजी केली. नंदकुमार पाटीलने २९ धावांत २ बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर भूषण वैद्य (२९ चेंडंूत ३६ धावा, २ चौकार), विशाल पाटील (२० चेंडूंत ३० धावा, २ चौकार) व जितेंद्र परदेशी (१६ चेंडूत २४ धावा, १ षटकार) यांच्या दमदार फलंदाजीमुळे हिंदुजा हॉस्पिटलने विजयी लक्ष्य ४ बाद १३० धावा असे पार केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. निलेश पावसकर, राधेशाम मिश्रा व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …