ठळक बातम्या

शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे काम ६० टक्के पूर्ण

मुंबई – भारतातील सर्वात लांब सी लिंक म्हणून ओळखले जाणारे शिवडी-न्हावा शेवा सी लिंक लवकरच पूर्ण होणार आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या सी लिंकचे काम ६० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने दिली आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणूनही ओळखले जातो. पुलासाठी बांधण्यात येणाऱ्­या एकूण १,०८९ खांबांपैकी ७०२ पेक्षा जास्त खांब आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. एकूणच, मुंबईतील या महत्त्वाच्या ट्रान्सहार्बर प्रकल्पाच्या बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. हा सी लिंक २०३४ पर्यंत पूर्णपणे तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलामुळे मुंबई शहराची रहदारी तर कमी होईलच, पण नवी मुंबईच्या विकासात भर पडेल. सध्या मुंबईतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मुंबई शहरातील रहदारीचे रस्ते पार करून जावे लागते. हा सी लिंक तयार झाल्यानंतर शिवडीहून थेट नवी मुंबईसाठी लोक उड्डाणपूल घेऊ शकतील, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि प्रवासाचा वेळही कमी होईल. हा प्रकल्प ३५ वर्षांपूर्वी आखण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात बांधकाम एप्रिल २०१८ मध्ये सुरू झाले. मुंबईतील वाहतुकीच्या सर्वेक्षणानुसार, शिवडी-न्हावा शेवा सी लिंक वापरणाऱ्या वाहनांची अंदाजे संख्या-मुख्य पुलावरील दररोजची वाहतूक ३९,३०० पेक्षा जास्त असेल. शिवाय, या सी लिंकवरील वाहतूक २०३२ पर्यंत १०३,९०० पर्यंत आणि २०४२ पर्यंत १४५,५०० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. हे आकडे सांगतात की, हा उड्डाणपूल मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतुकीसाठी किती महत्त्वाचा ठरेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …