शिर्डी – येथील लक्ष्मीनगर भागात एका खाजगी पार्किंगमध्ये एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत सूरज ठाकूर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी भल्या पहाटे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित तरुण घटनास्थळी गंभीर अवस्थेत पडला होता. ही घटना उघडकीस येताच स्थानिकांनी सूरजला तातडीने शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. भल्या पहाटे गोळीबार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, जखमी सूरज याच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला. याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही पुरावे सापडतात का?, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …