ठळक बातम्या

शिक्षिकेला प्रेमात अडकवत विद्यार्थ्याचा लाखोंचा गंडा

मुंबई – गुरू-शिष्याचे नाते हे पवित्र असते, मात्र मुंबईत शिक्षक व विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईमधील आरे पोलिसांनी एका अशा विद्यार्थ्याला अटक केली आहे. ज्याने त्याच्या शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याचे व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ त्या शिक्षिकेच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन त्या शिक्षिकेकडून आठ लाख रुपये उकळले. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव कृष्णकांत अखोरी (२५ वर्षे) असून, तो मुळचा दिल्लीचा आहे, तर महिला शिक्षिका ही देखील बिहारची असून, ती जेव्हा आपल्या पतीसोबत मुंबईत राहायला आली, तेव्हा कृष्णकांत अखोरीने ते व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देत पुन्हा एकदा शिक्षकेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी शिक्षिकेने याला नकार दिला. त्याचा राग मनात ठेऊन कृष्णकांतने ते व्हिडीओ शिक्षिकेच्या पतीला पाठवले. घडलेला प्रकार पाहता, शिक्षिकेच्या पतीने तिला विश्वासात घेत आरे पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी कृष्णकांत आखोरीला दिल्लीच्या संगम विहारमधून अटक केली. २०१६ मध्ये बिहारच्या पाटना येथे ती जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास घेत होती. त्यावेळेला कृष्णकांत अखोरी तिच्या क्लासमध्ये शिकत होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमामध्ये झाले. त्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघे वारंवार भेटू लागले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले, ज्याचे व्हिडीओ कृष्णकांतने गपचूप बनवले आणि ते व्हिडीओ दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला. ज्यासाठी शिक्षिकेने नकार दिला, तेव्हा त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून आठ लाख रुपये उकळले. काही वर्षांनंतर शिक्षिका जेव्हा आपल्या पतीसोबत मुंबईमध्ये स्थलांतरित झाली आणि मुंबईमध्ये राहू लागली तेव्हा आरोपी कृष्णकांतने दिल्लीत बोलून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. ज्याला शिक्षिकेने नकार दिला आणि त्यानंतर आरोपी कृष्णकांतने व्हिडीओ शिक्षिकेच्या पतीला पाठवले. महिला शिक्षिकेच्या पतीने यासंदर्भात आरे पोलीस स्टेशनमध्ये कृष्णकांत अखोरीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम ३८५, ३५४ (अ) आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असून, लोकेशनच्या आधारे कृष्णकांतला दिल्लीतून अटक केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …