नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील हातधुई येथे एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर, शाळेपासून ५० मीटर अंतरावर असणाऱ्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला आहे. आकाश बावा तडवी, असे आत्महत्या करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून, तो धडगाव तालुक्यातील हातधुई येथील शासकीय आश्रमशाळेत बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. आकाशने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोपी मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. आकाशने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, शाळा प्रशासनाने याची माहिती कुटुंबीयांना न देता, सर्वप्रथम पोलिसांना दिली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून घेतला. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर, शाळा प्रशासनाने याची माहिती मृत मुलाच्या कुटुंबीयांना दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे, तसेच मुलाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या शिक्षकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. पण शाळा प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …