शाहीन आफ्रिदीवर सासरेबुवा नाराज?

नवी दिल्ली – उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या शाहीन आफ्रिदीला पाकिस्तान सुपर लीग २०२२ च्या आधी मोठी बातमी मिळाली आहे. शाहीन आफ्रिदीला लाहोर कलंदरचा कर्णधार बनवण्यात आले आहे. शाहीनच्या पीएसएल संघाचा कर्णधार झाल्याबद्दल सासरा शाहिद आफ्रिदीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी मीडियाशी बोलताना शाहीद आफ्रिदीने शाहीनच्या लाहोर कलंदर संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीबद्दल आपले मत मांडले आणि म्हणाला, मी शाहीनला कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी एक-दोन वर्षे वाट पाहण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून तो कर्णधारपद स्वीकारू शकेल. पण तो आफ्रिदी असल्याने त्याने माझे ऐकले नाही. माजी पाकिस्तानी कर्णधार पुढे म्हणाला की, मला आनंद आहे की त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि मला आशा आहे की तो मला चुकीचे सिद्ध करेल.
दुसरीकडे, शाहीनने कलंदर्स संघाचा कर्णधार बनवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि ट्विट करून आनंद व्यक्त केला. एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही एक संघ म्हणून एकत्र खेळू आणि हृदय आणि ट्रॉफी दोन्ही जिंकू. तसेच, लाहोर कलंदरचा कर्णधार म्हणून हा मोठा सन्मान असल्याचेही शाहीनने ट्विटमध्ये म्हटले आहे. २०१८ सालापासून पाकिस्तान सुपर लीगमध्ये अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीकडे आता कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवल्याने या खेळाडूचा खेळ आणखी वाढेल, असा विश्वास लाहोर कलंदरचे प्रशिक्षक आकिब जावेद यांनी व्यक्त केला आहे.
विराट-गांगुली वादावर शाहिद प्रतिक्रिया
विराट कोहली-सौरव गांगुली वादावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलवर बोलताना सांगितले की, या प्रकरणाची चांगल्या पद्धतीने हाताळणी करता आली असती. या प्रकरणात क्रिकेट बोर्डाची भूमिका खूप महत्त्वाची असते, असे माझे मत आहे. निवड समितीने कोणतीही गोष्ट खेळाडूंना स्पष्टपणे सांगितली पाहिजे. त्यांनी खेळाडूंना भविष्यातील योजनांची तसेच त्यांच्याबद्दल असलेल्या मताची कल्पना देणे आवश्यक आहे. या गोष्टी मीडियातून समजल्या, तर अडचण होते. खेळाडू आणि क्रिकेट बोर्डामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे, असे आफ्रिदीने स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …