ठळक बातम्या

शाहीद आफ्रिदीसारखे लोक मला शिवीगाळ करायचे – दानिश कनेरिया

इस्लामाबाद – पाकिस्तानकडून सर्वाधिक बळी घेणारा फिरकीपटू दानिश कनेरियाने शाहीद आफ्रिदी आणि पीसीबीप्रमुख रमीझ राजा यांच्यावर काही आरोप केले आहेत. २००९मध्ये काऊंटी क्रिकेटदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दानिशवर आजीवन बंदी घातली होती. दानिश कनेरियाने सातत्याने मीडियासमोर येऊन या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्याने आपली चूक मान्य केली होती आणि एसेक्स पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिल्याचेही सांगितले होते. असे असूनही त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळाला नाही.
या मुद्यावर दानिश कनेरिया याने एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना पीसीबीवर पक्षपाताचा आरोप केला आहे, तसेच एकीकडे काही क्रिकेटपटू त्याला पाठिंबा देत होते, तर दुसरीकडे शाहीद आफ्रिदीसारखे क्रिकेटपटू त्याला शिवीगाळ करायचे. पीसीबीचे अध्यक्ष झाल्यानंतर रमीझ राजा यांनी किती पाठिंबा दिला?, या प्रश्नाला उत्तर देताना कनेरिया म्हणाला की, दर महिन्याला एक नवा अध्यक्ष पाकिस्तानात येतो. यापूर्वी नजम सेठी आणि एजाज बट या खेळाडूंकडे पीसीबीची जबाबदारी होती. त्याआधी एहसान मणीने खूप सांत्वन केले, पण याप्रकरणी काहीच केले नाही.
दानिशला त्याच्या सहकारी क्रिकेटपटूंकडून किती पाठिंबा मिळाला? या प्रश्नाला उत्तर देताना कनेरिया म्हणाला, मला काही सहकारी खेळाडूंचा पाठिंबा मिळाला. शोएब अख्तरने मला पाठिंबा दिला, कर्णधार इंझमाम-उल-हक, मोहम्मद युसूफ, युनूस खान आणि राशिद लतीफ यांनी मला साथ दिली, पण शाहीद आफ्रिदीसारखे लोक मला शिवीगाळ करायचे. कधी ए ग्रेडमध्ये नाव आले की म्हणायचे, आता आमच्याशी बरोबरी करणार का तू? आफ्रिदीच्या जनसंपर्काचे संबंध कुठे-कुठे आहेत, हे मला माहीत आहे, पण एखाद्याचे करिअर खराब होता कामा नये, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …