ठळक बातम्या

शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीची गाडी सीसीटीव्हीत कैद

२५ कोटींचे खंडणी प्रकरण
पोलिसांच्या हाती महत्त्वाचं फुटेज

मुंबई – मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक झाली. या प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे. खंडणीचा आरोप झाल्याप्रकरणी तपास करणाºया मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाला मिळालेलं हे सीसीटीव्ही फुटेज लोअर परळ परिसरातील आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. ज्या ठिकाणी ही मर्सिडीज कार दिसत आहे, त्याच ठिकाणी २५ कोटींची खंडणीची डील झाली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे आता मुंबई पोलीस तपास करत आहेत. जर पुरावे मिळाले, तर किरण गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजनंतर खंडणी प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. खरोखर खंडणी मागितली होती का? ही खंडणी कोणी मागितली होती आणि पैसे कोण घेणार होतं, या सर्वांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
प्रभाकर साईल याने एनसीबीच्या एका बड्या अधिकाºयावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला २५ कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील १८ कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं, तसंच प्रभाकरने दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले ८ कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाºयांना द्यायचे आहेत, असं बोलणं सुरू होतं.

क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे १५ मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला १० साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
आपण गोसावी यांना ५० लाख रोख रक्कम भरलेल्या २ पिशव्या दिल्या, तसंच १ आॅक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता गोसावीनं फोन केला आणि २ आॅक्टोबर रोजी सकाळी ७:३० पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …