ठळक बातम्या

शाहरुख या दिवशी सुरु करणार पठाणचे शूटींग


आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खानने आपल्या व्यावसायिक आयुष्यातून थोडा काळ ब्रेक घेतला होता. परंतु सर्व गोष्टी स्थिरस्थावर झाल्या असल्याने शाहरुख आता आपल्या चित्रपटाच्या शूटींगकरिता सेटवर येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार शाहरुख येत्या 15 डिसेंबरपासून दिपिका पदुकोण व जॉन अब्राहमबरोबर पठाणचे शूटींग पुन्हा सुरु करेल असा अंदाज आहे.
मिडिया रिपोर्टनुसार बॉलीवूड किंग शाहरुख खान येत्या 15 डिसेंबरपासून जॉन अब्राहम आणि दिपिका पदुकोण बरोबर पठाणचा महत्त्वाचा सिक्वेन्स शूट करणार आहे. या ॲक्शन शेड्यूलकरिता मुंबईत एक बंद सेट बनवण्यात आला आहे, जो येत्या 15 ते 20 पूर्ण होण्याची आशाा आहे. या शेड्यूलनंतर शाहरुख पठाणच्या आंतरराष्ट्रीय शेड्यूलसाठी देखील रवाना होणार आहे. परंतु अद्याप या शेड्यूलसाठी कोणतेही ठिकाण किंवा तारीख निश्चित झालेली नाही. त्याचबरोबर या चित्रपटात सलमान कॅमियो करेल अशी चर्चा आहे. परंतु या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाद्वारे शाहरुख खान प्रदीर्घ काळानंतर चित्रपटांत कमबॅक करत आहे. यापूर्वी तो अनुष्का शर्मा व कतरीना कैफ यांच्यासोबत झीरोमध्ये अखेरचा दिसून आला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …