ठळक बातम्या

शास्त्रींनी बायो बबलवर फोडले पराभवाचे खापर

दुबई – भारतीय संघातील खेळाडू मागील ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. मी स्वत: मानसिकरित्या कमकुवत झालो असून, संघातील खेळाडू मानसिक आणि शारीरिकरित्या थकले आहेत. आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अंतर असायला पाहिजे, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात त्यांनी टीम इंडियाच्या पराभवाचे खापर हे बायो बबलच्या वातावणावर फोडल्याचे पाहायला मिळाले.

माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने सर्वोच्च कामगिरी करून दाखवली आहे. ज्यावेळी मी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी हाती घेतली, त्यावेळी काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या इराद्याने टीमसोबत जोडलो गेलो. पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम संघ या काळात निर्माण झाला, अशा शब्दांत रवि शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. नामिबिया विरुद्धचा सामना प्रशिक्षक म्हणून त्यांच्यासाठी शेवटचा असेल. या सामन्यापूर्वी रवि शास्त्री यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना टीम इंडियाच्या दिमाखदार कामगिरीचा साक्षी झाल्याचा आनंद व्यक्त केला.
२०१७ मध्ये अनिल कुंबळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबादारी स्वीकारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ कसोटी सामन्यांत भारतीय संघाने २५ सामने जिंकले आहेत. वनडेत ७२ पैकी ५१ आणि टी-२० मध्ये ६४ पैकी ४२ सामन्यांत संघाने यश मिळवले आहे. भारतीय संघाचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. पण या यशासोबतच एक ठपकाही शास्त्रींच्या कोचिंगवर लागला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात आणला. त्यानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली वहिली ट्रॉफी जिंकण्याची संधीही टीम इंडियाने गमावली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …