शाळा सुरू होण्याआधीच लागल्या पुन्हा सुट्ट्या

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये दीड वर्षे बंद होती, मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत, मात्र पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग अनेक ठिकाणी सुरू झालेले नाहीत. त्यामुळे राज्यात पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला, मात्र १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम आहे.
राज्य सरकारने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही, याची शंका आहे. दरम्यान, नाताळ सुट्ट्यांमुळे शाळा नवीन वर्षातच सुरू करा, अशी शिक्षक आणि पालकांकडून मागणी करण्यात येत आहे. इंग्रजी शाळांना २३ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान नाताळच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे या १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा डिसेंबरऐवजी नवीन वर्षातच सुरू करा, अशी मागणी शिक्षक-पालक करत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना २३ ते १ जानेवारीदरम्यान दरवर्षी नाताळची सुट्टी असते. १५ डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्यास आठवडाभरानंतर नाताळची सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातच शाळा सुरू करण्याची मागणी आता शिक्षक आणि पालक करत आहेत.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …