ठळक बातम्या

शाळांबाबतचा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून – टोपे

मुंबई – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, निर्बंध आणि १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण यासह शाळा सुरू ठेवण्याबाबत बुधवारी भाष्य केले. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीने सज्ज आहोत. भारत सरकारने लहान मुलांना कोव्हॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का? याचीही चाचपणी सुरू असल्याचे राजेश टोपे म्हणाले. राज्यातील शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी पॉझिटिव्ह मिळाले आहे. अहमदनगरला जे झालेय त्याचा केस स्टडी म्हणून विचार केला जाईल. पॉझिटिव्ह झाले, तरी मुलांचा आजार बळावत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसांत शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …