ठळक बातम्या

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. वर्षा गायकवाड यांना सोमवारी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत होती, त्यानंतर आपण स्वत:ला आयसोलेट करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. वर्षा गायकवाड यांनी कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. कोरोनाची लक्षणे सौम्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या प्रकृती व्यवस्थित असून, सुरक्षेच्या कारणामुळे आयसोलेट करून घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मंगळवारी वर्षा गायकवाड यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनादेखील कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते देखील आयसोलेट झाले होते. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले होते. समीर मेघे यांनी फेसबुकवर पोस्ट करीत स्वत:ला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यांनी स्वत:च्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचा सल्लाही दिला होता. सोमवारी विधानसभेतील तब्बल ३५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …