नवी मुंबई- नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमाने राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन सीबीडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धा तीन गटांत संपन्न झाल्या. या स्पर्धेत शरदचंद्र चषक २०२१ चा मानकरी गणेश जाधव तर बेस्ट पोझर विनायक लोखंडे ठरला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई उपाध्यक्ष धनाजी खराडे व समाजसेविका डॉ. ज्योती खराडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. खेळाडूंनी शरीरसौष्ठवच्या विविध क्रीडा प्रकारांचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर करून क्रीडाप्रेमींची मन जिंकली. या स्पर्धेत आशिष मारकोजा, उमेश गुप्ता, प्रणव कोतवाल, दिनेश इंगळे, आशिष लोखंडे, गणेश उरणकर, गणेश पेडामकर आदींनी विविध शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेता म्हणून मान मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोकशेठ गावडे, कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, उपाध्यक्ष धनाजी खराडे, डॉ. ज्योती खराडे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विनय मोरे, जसपाल सिंग यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. नवी मुंबई बॉडी बिल्डर असोसिएशन आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा पाहण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई आदी ठिकाणाहून क्रीडाप्रेमी उपस्थित होते.