शरद पवारांना खुर्ची देण्यावरून राजकारण! संजय राऊतांना संताप अनावर; अपशब्दही वापरले

नवी दिल्ली – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवरून काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती. यावर गुरुवारी संजय राऊतांना संताप अनावर झाला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लालकृ ष्ण अडवाणी जरी असते, तरी मी खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृ ती आहे, अशा शब्दांत राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांबाबत अपशब्द देखील वापरले.
राऊत म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृ ती विचारात घेता त्यांना होणारा त्रास जास्त आहे. आपण बसतो तसे त्यांना खाली बसता येत नाही. म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली. लालकृ ष्ण अडवाणी, मुलायम सिंह यादव, मुरली मनोहर जोशी असे नेते जरी असते, तरी मी खुर्ची आणून दिली असती. हे राजकीय विरोधक जरी असले, तरी ती पितृतुल्य व्यक्तिमत्वे आहेत.
ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोरही उभे केले नाही. त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरू आहेत आणि त्यांनी मला हा संस्कार दिला आहे. मोठ्यांचा आदर करावा. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. हे या ***** लोकांना कळत नाही. ही ***** बंद करा. अशाने तुमचे राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. हा तुमच्या डोक्यातील कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डम्पिंग ग्राऊं डमध्ये लोक तुम्हाला गाडून टाकतील. हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतोय. मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्याने जर तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे राऊत म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …