ठळक बातम्या

शनाया कपूरने सुरू केले आपल्या डेब्यू फिल्मचे शूटिंग

संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या शनाया कपूर हिने आता आपल्या डेब्यू फिल्मचे शूटिंग सुरू केले आहे. संजय कपूरने आपल्या मुलीसोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्या जोडीला एक सुंदर नोट लिहिली आहे.

संजय कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सहा फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा दिसून येत आहे. संजय कपूरने त्याच्या जोडीला कॅप्शनमध्ये लिहिले आहे,’नवीन सुरुवात करत हा तुमच्यावर गर्व आहे. मेहनत करा, फोकस करा, ही तर केवळ सुरुवात आहे. आकाश मर्यादा आहे.’ त्याच्या या पोस्टवर अमृता अरोडा, फराह खान, वर्धा खान, करण बुलानी, भावना पांडेसह अनेक सेलेब्सने कमेंट्स केल्या आहेत. शनाया कपूर ही दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या चित्रपटाद्वारे गुरफतेह पीरजादा आणि लक्ष्य लालवानीबरोबर डेब्यू करणार आहे. शनाया कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते आणि आपले ग्लॅमरस फोटो आणि डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसून येते. शनाया ही भलेही अद्याप पडद्यावर दिसून आलेली नाही, परंतु तिने बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली सुरुवात केव्हाच केली आहे. शनायाने आपली कझन जान्हवी कपूरचा चित्रपट गुंजन सक्सेना : द कारगिल गर्लमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …