बॉलीवूडमध्ये लवकरच आणखी एक कपूर गर्ल आपले अभिनयाचे हुनर दाखवण्यासाठी उत्सुक आहे. संजय कपूर व महीप कपूर यांची कन्या शनाया ही लवकरच करण जौहरच्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. परंतु अभिनयात दाखल होण्यापूर्वीच शनायाने सोशल मिडिया गाजवून सोडला आहे. शनायाचे इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मिलीयन फॉलोअर्स असून तिच्या फोटोेंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
शनायाने आता आपले काही नवीन फोटो शेअर केले आहे, ज्यात ती निळ्या रंगाचा क्लीव्हेज गाऊन घातलेली दिसून येते. तिच्या या फोटोवर तिचे कुंटुंबिय तसेच फ्रेंड्सबरोबर फॉलोअर्सनी देखील कमेंट्स केले आहेत. एका युजरने लिहिले आहे,’ चांद पर डाग हो सकता है, मगर शनाया की खूबसुरती बेदाग है.’ कुणी शनायाला प्रिटी म्हटले आहे तर कुणी गॉर्जिअस. अनेक फॉलोअर्सनी फायर आणि दिलची इमोजी पाठवून शनायाचे कौतुक केले आहे.
शनायाने नुकतेच आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. 22 मार्च रोजी करणने सोशल मिडियाद्वारे शनायाच्या बॉलीवूड प्रवासाची सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.