शंकरराव मोहिते-पाटील बँकेत २७ कोटींचा घोटाळा

पंढरपूर – अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेत २७ कोटी ६ लाख १९ हजार ८१४ रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी बँकेचे पुणे येथील लेखा परीक्षक गोकुळ राठी यांनी सहा जणांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या बँकेची स्थापना माजी मंत्री प्रतापसिंह मेहिते यांनी केली असून, बँकेत घोटाळा झाल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

असे कळते की, ३ एप्रिल २०२१ ते २० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अकलूज येथील मुख्य शाखेचे व्यवस्थापक नितीन उघडे यांनी २४ कोटी १८ लाख २१ हजार ८१४ रुपये, टेंभुर्णी शाखेचे व्यवस्थापक रवींद्र पाताळे यांनी ५३ लाख ८४ हजार रुपये, करमाळा शाखेचे व्यवस्थापक समीर दोशी यांनी १ कोटी ४० लाख ८४ हजार १६१ रुपये, सोलापूर शाखेचे व्यवस्थापक प्रदीप उघडे यांनी ५३ लाख ३४ हजार रुपये, इंदापूर शाखेचे व्यवस्थापक सचिन सावंत यांनी ६ लाख ५० हजार रुपये आणि कोथरुड शाखेचे व्यवस्थापक राहुल भिंगारदीवे यांनी ३३ लाख ४५ हजार ८०० रुपये या सर्वांनी मिळून एकूण २७ कोटी ६ लाख १९ हजार ८१४ रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी या सहाही जणांविरोधात लेखा परीक्षक गोकुळ राठी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान बँकेत घोटाळा झाल्याचे समोर आल्याने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घोटाळ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच ठेवीदारांनी बँकेत गर्दी केली होती. या बँकेमध्ये अनेक नागरिकांच्या ठेवी आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …