पुणे – ‘गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचेनिधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. रविवारी (दि.३१) सकाळी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांच्या जाण्यानं मराठी संगीत विश्वाची मोठा हानी झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. मराठी आणि हिंदी क्षेत्रातील मोठमोठ्या संगीतकारांशी त्यांचा संवाद होता. त्यांच्याशी ऋणानुबंध होते. ते त्यांनी अखेरपर्यंत जपले. त्यांच्या व्हायोलिन वादनाने केवळ भारतातीलच नाही जर जगभरात असलेले मराठी संगीतप्रेमी जोडले गेले होते. त्यांनी सुरुवातीला गजानन राव जोशी आणि नारायणराव मारुलीकर यांच्याकडून गायन आणि संगीताचे धडे गिरवले. जोगकाका म्हणून लोकप्रिय झालेल्या प्रभाकर जोग यांना त्यांच्या बंधुंकडून देखील व्हायोलिन वादनाचे मार्गदर्शन मिळाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.
मराठी भावगीत आणि हिंदी गीतांचे त्यांनी व्हायोलिनवर सादरीकरण करून व्हायोलिनला गाते केले. जोग यांच्या व्हायोलिन वादनातून शब्द ऐकू येऊ लागल्याने त्यांचे वादन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. तसेच, या ध्वनिफितींना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच मंगल प्रसंगी गाणाऱ्या व्हायोलिनचे स्वर रसिकांच्या कानी पडत असतात. त्यामुळे त्यांचेव्हायोलिन गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै२०१७) आणि २०१७ सालचा गदिमा पुरस्कार , २०१५ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार , ‘ कैवारी’, ‘चांदणे शिंपीत जा’ आणि ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ‘सूरसिंगार पुरस्कारानेगौरवण्यात आले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …