
पनवेलच्या ज्वेलर्स मार्केटची पुनरावृती कामोठे परीसरात…
पनवेल – एका सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यावर 4 जणांनी हल्ला करून त्याच्याजवळ असलेली 18 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना पनवेल जवळील कामोठे बस थांब्याजवळ घडली आहे.
व्यापारी संतोष जाधव (वय-38) यांची अंबेजोगाई येथे सोन्याची पेढी आहे. ते नेहमी मुंबई परिसरात येऊन सोन्या चांदीची खरेदी करून माल घेऊन जात असतात. अशाचप्रकारे ते मुंबई येथे सोने खरेदी करण्यासाठी एका खाजगी बसमधून येत होते. सकाळच्या वेळी सदर बस हि कामोठे येथे थांबली असताना चार अज्ञात व्यक्ती त्या बसमध्ये घुसले व त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या धारधार वस्तूंनी जाधव यांच्यावर वार केले व त्यांच्याजवळ असलेली 18 लाखांची रोकड घेऊन ते पसार झाले. यात जाधव हे जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कामोठे पोलिसांना मिळताच घटनास्थळी ते रवाना होऊन विविध पथके सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.अशाच प्रकारचा सोने व्यापारी याच्यावर पनवेलच्या जव्हेरी बाजारात खुनी हल्ला करून आरोपी पसार झाले होते आजमीतीला ते आरोपी पोलीसांच्या हाती लागले नाहीत अशी माहीती प्राप्त होत आहे