कणकवली – मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसला पत्राद्वारे दिले आहे. राणे यांना कणकवली पोलिसांनी बुधवारी दुपारी ३ वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटीस दिली होती. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत?, असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होते. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या घरावर ही नोटीस चिकटवण्यात आली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्र देऊन या नोटीसचे उत्तर दिले आहे. राणे आपल्या पत्रात म्हणतात की, मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही. कामामुळे आणखी दोन ते तीन दिवस व्यस्त राहणार आहे. व्हिडीओ कान्फरन्स (व्हीसी)द्वारे तुम्ही माझा जबाब घेऊ शकता, असे आवाहनही राणे यांनी केले आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …