व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्यासाठी मी माझी देहबोली आणि वर्तणूकही बदलली

आपल्या रुग्णाला बरे करण्यासाठी एखादी नर्स प्रयत्नांची किती पराकाष्ठा करू शकते, याचे चित्रण करणारी ‘अगर तुम ना होते’ ही मालिका ‘झी टीव्ही’ वाहिनीवर नुकतीच प्रसारित होऊ लागली आहे. ही नियती मिश्रा या तरुण, कष्टाळू आणि समर्पित परिचारिकेची आणि देखण्या, श्रीमंत पण मानसिक अस्थैर्याने ग्रस्त असलेल्या तरुण अभिमन्यू पांडे यांची कथा
आहे. मालिकेच्या या वैशिष्ट्यपूर्ण कथानकाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली असून, अभिमन्यू (हिमांशू सोनी) आणि नियती (सिमरन कौर) यांच्यातील हळुवार नात्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे. हिमांशू सोनी आणि सिमरन कौर या मालिकेच्या नायक-नायकांनी प्रेक्षकांवर आपला ठसा उमटविला असला, तरी मालिकेतील आणखी एका व्यक्तिरेखेने आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. हा कलाकार आहे अविनाश वाधवान. अविनाश यांनी यापूर्वी ‘झी टीव्ही’वरील ‘पिया अलबेला’ मालिकेत भूमिका साकारली होती. आता तब्बल तीन वर्षांनी ते या मालिकेत गजेंद्र पांडेच्या भूमिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहेत.

मालिकेत अर्जुनचे वडील गजेंद्र पांडे यांची व्यक्तिरेखा अविनाश साकारणार आहेत. गजेंद्र पांडे हे उत्तर प्रदेशातील श्रीमंत, प्रभावशाली आणि धूर्त पॉवर ब्रोकर असतात. ते शक्तिशाली आणि अधिकारी व्यक्ती असून, त्यांनी एखादे काम मनावर घेतले की, ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाहीत. त्यांचे आपल्या कुटुंबीयांवर खूप प्रेम असते आणि साºया
कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. त्यांच्या व्यक्तिरेखेला काहीशी काळी बाजू आहे, असे वाटत असले, तरी कथानक जसजसे उलगडेल, तसतसे प्रेक्षकांना दिसेल की, त्यांचे आपल्या कुटुंबावर अतिशय प्रेम आहे.

त्यांचे आपल्या मुलाबरोबर खटके उडत असले, तरी गरजू व्यक्तीला त्याच्या अडचणीत मदत करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. गजेंद्र पांडेंच्या तशा भावनोत्कट भूमिकेला साकार करण्यासाठी अविनाश यांनी नवे रूप घेतले आहे. आपल्या अभिनय गुणांनी गजेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखविण्यास अविनाश उत्सुक बनले आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल अविनाश वाधवान म्हणाले, तब्बल दोन-अडीच वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा टीव्हीच्या पडद्यावर झळकताना मला खूप आनंद होत आहे. टीव्हीवरील पुनरागमनाबद्दल सांगायचे झाल्यास, मला असे वाटते की, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंतपोहोचण्याची जी क्षमता टीव्हीमध्ये आहे, तशी ती चित्रपट किंवा अगदी

ओटीटी माध्यमांकडेही नाही. मला जेव्हा माझ्या भूमिकेची रूपरेषा प्रथम सांगण्यात आली, तेव्हा मी खूपच उत्सुक बनलो होतो. कारण मी एका सशक्त कथानकाच्या आणि भूमिकेच्या शोधात होतो. गजेंद्र पांडे ही व्यक्तिरेखा तशी गुंतागुंतीची असून, मी अशा प्रकारची भूमिका यापूर्वी साकारलेली नव्हती. या कथेत भावभावनांचे खूप चढ-उतार आहेत आणि
त्यातील नाट्यमय प्रसंगांतून पिता-पुत्रातील तणावपूर्ण परंतु गहिरे नाते व्यक्त होताना दिसते. मला ही भूमिका साकारताना खूप मजा येत आहे आणि या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी मी माझी देहबोली, कपडे आणि अगदी वर्तनही बदलले आहे. वैयक्तिक जीवनात माझा स्वभाव गजेंद्र पांडे यांच्या निष्ठूर आणि दिखाऊपणापेक्षा अगदीच विरुद्ध

आहे. त्यामुळे गजेंद्र पांडेंची व्यक्तिरेखा उभी करणे माझ्यासाठी तसे आव्हानाच होते. तरीही मी माझ्या परीने ही व्यक्तिरेखा अस्सलपणे उभी करण्याचा प्रयत्न करत आहे

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …