ठळक बातम्या

व्यंकटेश अय्यरने ठोकले शतक


मुंबई- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.सध्या सुरू असलेल्या विजय हजारेकरंडक स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार या टीमच्या निवडी वेळी केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण आफ्रिका दौरा तोंडावर आलेला असतानाच टीम इंडियाच्या ऑल राऊंडरनं दमदार शतक झळकावत दावेदारी सादर केली आहे.
मध्य प्रदेशचा खेळाडू व्यंकटेश अय्यरनेगेल्या काही महिन्यापासून सातत्यपूर्णकामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडून दमदार कामगिरी केल्यानंतर त्याची न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून अय्यरकडे सध्या पाहिलेजात आहे. अय्यरची नजर सध्या एकदिवसीय मालिकेवर आहे. निवड प्रक्रियेपूर्वीत्यानेकेरळविरुद्ध दमदार शतक झळकावलेआहे.
मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या अय्यरने केरळविरुद्ध फक्त ८४ चेंडूंत शतक झळकावले. या खेळात त्याने ७ चौकर आणि ४ षटकार लागावले. अय्यरच्या आक्रमक शतकामुळेमध्य प्रदेशने९बाद ३२९ धावांपर्यंत मजल मारली. अय्यरला शुभम शर्मानं ८२ रन करत चांगली साथ दिली. केरळकडून विष्णू विनोदनं सर्वात जास्त ३ विकेट्स घेतल्या.
अय्यरने या वर्षाच्या सुरुवातीला पंजाब विरुद्ध ओपनिंगला येत १४६ चेंडूंत २० चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर १९८ धावांची खेळी साकारली . या खेळीमुळेच त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं करारबद्ध केले होते. अय्यरनेआयपीएलच्या सेकंड हाफमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला केकेआरनं रिटेन केले आहे. यापूर्वी ओपनर म्हणून खेळणाऱ्या अय्यरनं टीम इंडियाची गरज म्हणून या स्पर्धेत मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याची सुरूवात केली आहे. फिनिशर म्हणूनही तो प्रयत्न करत आहे. तसंही हार्दिक पंड्या ही बाहेर असल्यानं टीम इंडिया एका फिनिशरच्या शोधात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …