वॉर्नर खुर्चीवरून पडला

मेलबर्न – अ­ॅडलेड येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अ­ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रविवारी ड्रेसिंग रुममध्ये एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले. ड्रेसिंग रुममध्ये जे घडले, त्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना अन्य खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये बसून चर्चा करत होते. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शेजारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कोच जस्टिन लँगर बसले होते. यादरम्यान खुर्चीवर बसलेल्या वॉर्नरला शिंक आली. ही शिंक इतकी जोरदार होती की, वॉर्नर खुर्चीवरून कोसळला. त्यावेळी शेजारी बसलेला स्मिथ आणि लँगरही दचकले. वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नरचे अ­ॅशेस मालिकेत दमदार प्रदर्शन सुरू आहे. आतापर्यंत दोन वेळा वॉर्नर नर्व्हस नाईंटीमध्ये आऊट झाला आहे. दोन्ही कसोटीमध्ये वॉर्नरचे शतके अगदी थोडक्यात हुकले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …