वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरली माइली सायरस

नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण जग हे नववर्षाच्या स्वागतामध्ये बिझी आहे. कोरोनामुळे लोकांच्या उत्साहावर भलेही विरजण पडले असले, तरी त्यानंतरही लोकांनी संधी मिळताच २०२२चे स्वागत आपल्या परीने केलेच. २०२२च्या या स्वागताप्रित्यर्थ अभिनेत्री-सिंगर माइली सायरसदेखील परफॉर्म करत होती. त्याचवेळी स्टेजवर माइली वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरली, मात्र माइलीने अगदी हुशारीने परिस्थिती सांभाळली आणि परफॉर्मन्स पूर्ण केले.
हा एनबीसीचा न्यू इअर स्पेशल प्रोग्रॅम होता. माइली स्टेजवर परफॉर्म करत होती. या कार्यक्रमाचे नावच मुळी माइली न्यू इअर इव्ह पार्टी असे होते. त्यावेळी माइली चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दाखल झाली होती. तिचा परफॉर्मन्स चाहते खूप एंजॉयही करत होते. माइली नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती. त्याचवेळी अचानक ती वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरली, मात्र तत्परतेने तिने एका हाताने आपला ड्रेस सांभाळला आणि ती गाताना दिसून आली. जेव्हा परफॉर्मन्सची वेळ येते, तेव्हा ती एक प्रॉमिसिंग परफॉर्मर आहे, हेच यावेळी माइलीने सिद्ध केले. माइलीच्या परफॉर्मन्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, इतका मोठा अपघात झाल्यानंतरही माइलीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास जराही डगमगला नाही व पूर्ण कॉन्फीडन्सने तिने आपले परफॉर्मन्स सादर केले. तब्बल एक ते दीड मिनिटांच्या या व्हिडीओत माइली आधी सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येते. त्यानंतर ती वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार होते व बॅक स्टेजला जाते. तोपर्यंत तिच्याबरोबरचे सिंगर्स हे सांभाळून घेतात. काही सेकंदांनंतर माइली पुन्हा स्टेजवर अवतरते. त्यावेळी ती रेड कलरच्या ब्लेझरमध्ये पहायला मिळते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …