वैष्णोदेवी चेंगराचेंगरी : दर्शनाच्या पद्धतीत बदल करण्याचा विचार

जम्मू – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यामध्ये १३ भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबत, देवस्थान विश्वस्त मंडळाने म्हणजे वैष्णोदेवी मंदिर समितीने त्यांची भूमिका मांडली आहे. यात्रेकरूंच्या दोन गटांमधील भांडणामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३५ हजार यात्रेकरूं ना परवानगी देण्यात आली होती, असेही समितीने सांगितले आहे, मात्र या घटनेवरून मंदिर समितीवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर एका तासाने पुन्हा दर्शनाला परवानगी देण्यात आली, त्यामुळे यात्रा सुरू राहिली. शनिवारी जवळपास २७ हजार भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने घटनास्थळी भेट देत चौकशी केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतील जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याची कोणतीही व्यवस्था मंदिर समितीने केली नव्हती, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. गर्दीबाबत मंदिर समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात दर्शनाच्या पद्धती बदलण्याचा विचारही सरकार करीत आहे. एका दिवसाचा दर्शनाचा कोटा ३५ हजार भाविकांचा असताना, घटनेवेळी ५० ते ६० हजार भाविक उपस्थित कसे होते? असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …