वेध निवडणुकीचे

देशातील सर्वात मोठे, निर्णायक असे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्याचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत. त्यामुळे सर्वांनीच त्यादृष्टीने तयारी करायला सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पक्षानेही या निवडणुका जिंकण्याची तयारी केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दिल्लीत रविवारी झालेली कार्यकारिणीची बैठक. या बैठकीत नरेंद्र मोदींनी सेवा, संकल्प आणि समर्पणाची साद घालत, हाच मंत्र निवडणुकीसाठी प्रभावी ठरेल असे सुचवले.

भाजपची बैठक म्हणजे नेहमीच हायटेक आणि नियोजित असते. भाजप बैठकीचा तपशील बैठक सुरू असताना कुठेही जाणार नाही आणि नंतर त्यांच्या भाषणातील विचार बाहेर पडतील याची घेतलेली खबरदारी महत्त्वाची आहे. अन्य कोणत्याही पक्षाची बैठक सुरू असली की, त्यातील कुरघोड्या बाहेर येतात. आठच दिवसांपूर्वी काँग्रेसची बैठक झाली होती, त्यावेळी सोनिया गांधींनी अनेकांना कसे झापले, याच्या बातम्या झाल्या. पण भाजपच्या बैठकीत असे काही बाहेर आले नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
एरवी लाइव्ह भाषणे दाखवली जातात, पण अंतर्गत बैठक असल्याने त्याचा तपशील बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेतली गेली हे फार महत्त्वाचे आहे.

त्यामुळेच रविवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने झाली, तसेच आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांची देखील बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेतून या बैठकीबाबत माहिती दिली. तोपर्यंत कोणताही तपशिल भाजपने बाहेर पडू दिला नव्हता. सर्वांना वाटत होते, विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला की, मोदींचे भाषण लाइव्ह पाहायला मिळेल, पण मोदी काय बोलले हे पण भूपेंद्र यादव यांच्यामार्फत सांगण्यात आले.
भूपेंद्र यादव म्हणाले की, रविवारी सकाळपासून कार्यकारिणीची बैठक सुरू होती. बैठकीच्या पहिल्या सत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण झाले, तर बैठकीच्या दुस‍ºया सत्रात गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्याचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांद्वारे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विषय मांडण्यात आला. राज्य सरकारकडून पाच वर्षांमध्ये जे काम करण्यात आले, त्याचा मुख्यमंत्र्यांनी लेखाजोखा मांडला. याचबरोबर जनेतशी जोडण्यासाठी, त्यांच्यात विविध विषय नेण्यासाठी, विविध वर्गांसोबत समन्वय साधण्यासाठी पार्टीकडून ज्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत, त्याबाबत संपूर्ण माहिती तेथील प्रदेशाध्यक्षांनी दिली. या चार राज्यांशिवाय पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांनी आगामी काळात भाजप तयारीनिशी सर्व जागांवर निवडणूक लढवले, असे सांगितले गेले. तसेच यानंतर या कार्यकारिणी बैठकीची सांगता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने झाली.

यातून भाजपने स्पष्टपणे दाखवून दिले की, आमच्याकडे व्यक्तिस्तोम नसते. घराणेशाही नसते. पंतप्रधानपद त्यांच्या जागी आहे, येथे मोदी कार्यकर्ता म्हणूनच असतील. त्यामुळे या बैठकीत भाजप नेते असाच उल्लेख मोदींचा केला. ते पंतप्रधान म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकत नाहीत, ते देशाचे पंतप्रधान आहेत, भाजपचे नाही हा दिलेला संदेशही बरेच काही सांगून जातो.
मोदींनी आगामी काळात भाजपची कार्यनीती बनवण्यासाठी एक मोठा मंत्र सर्व कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या मनाच्या विश्वासाचा सेतू बनले पाहिजे, तसेच त्यांनी पक्षाच्या इतिहासाचा दाखला देत सांगितले की, भाजपने केंद्रात आज जे स्थान मिळवले आहे. त्याचे अतिशय मोठ कारण हे आहे की, सुरुवातीपासून आतापर्यंत भाजप हा सामान्य माणसांशी जोडलेला असतो. भाजप ही कुटुंबावर आधारित पार्टी नाही. त्यामुळे भाजप ज्या मूल्यांना घेऊन चालली आहे. त्यामध्ये सेवा, संकल्प आणि समर्पणाशी जोडून, कुण्या एका विशिष्ट कुटुंबाशी जोडून नाही, तर पार्टीची परंपरा आहे. परंपरेला पुढे नेत व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आपण पुढे चाललो आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितले की, आगामी काळात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना या विश्वासाला घेऊन वाटचाल करावी लागेल.

कोविड काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात केवळ राजकारण नाही, तर सेवा परमो धर्म या तत्वानुसार काम केले. हे बिंबवण्यासाठी सेवा, संकल्प आणि समर्पण या मंत्राचा वापर करत निवडणुकांचा संकल्प भाजपने केलेला दिसून येतो.
या आगामी निवडणुकीत पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या अपयशाची चर्चा होणे अपेक्षित होते, पण पश्चिम बंगालमध्ये आपण काहीच नसताना मिळवलेल्या यशाचा विचार केला गेला. भाजपचा उदय अजून व्हायचा आहे, हे अधोरेखित केले गेले.

यावेळी मोदींनी आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समस्त कार्यकर्त्यांना उत्साहाने पक्षाचे काम पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यासाठी सेवा, संकल्प आणि समर्पणाचा मंत्र त्यांनी दिला. आगामी निवडणुकीत भाजप मोदींचा चेहरा घेऊन जाणार नाही हे आधीच ठरलेले असल्यामुळे मोदींनी फक्त या कार्यकारणीत मार्गदर्शन केले आहे. ते स्टार प्रचारक नसतील. तर स्टार प्रचारक म्हणून अन्य नेते सहभागी होतील. हा प्रयोगही यशस्वी होतो का?, हे आता पाहावे लागेल. मोदी म्हणजेच भाजप हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न या पाच राज्यांत केला जाईल. तो यशस्वी होतो का?, हे पाहण्यासाठी चार महिने थांबावे लागेल.
– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …