ठळक बातम्या

वेगाबाबत नवीन नियम येणार; नियम मोडल्यास एफआयआर दाखल होणार – गडकरी

गाझियाबाद – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही. केंद्रातील मोदी सरकार लवकरच गाड्यांच्या वेगाबाबत एक नवीन नियम बनवणार आहे, यामध्ये कोणी वाहतुकीचे नियम मोडताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल होणार आहे. याबाबतची माहिती स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना येथे एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, लवकरच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरील वेगाबाबत नवीन नियम करण्यात येणार आहे. वाहतुकीचा नियम कोणी मोडला तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील आणि त्याआधारे एफआयआर दाखल होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
डासना येथील एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्षाच्या इमारतीचे उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले की, लोकांना एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्षाचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. हे जपान आणि जायका यांच्या सहकार्याने बनवले आहे. दरम्यान, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावरील वाहतुकीशी संबंधित गतिविधींवर लक्ष ठेवण्यासाठी डासना येथील एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्ष इमारत स्थापन करण्यात आली आहे. नितीन गडकरी म्हणाले की, पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकन आणि युरोपियन दर्जाचे बनतील. दिल्ली ते लखनऊला जोडणाऱ्या एक्स्प्रेस वेचे १० ते १२ दिवसांत भूमिपूजन केले जाईल. तसेच, ते म्हणाले की, हा एक्स्प्रेस वे लखनऊ ते कानपूर आणि कानपूर ते गाझियाबादला जोडला जाईल. त्यानंतर तो दिल्लीला जोडला जाणार आहे, त्यामुळे प्रवास अतिशय सहज आणि जलद होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …