वेगळ्या व्यक्तीरेखांनी लारा दत्तासाठी खुले केले नवे मार्ग


बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता सध्या आपले नवे प्रोजेक्ट हिकप्स ॲँड हुकअप्समुळे चर्चेत आहे. गेली काही वर्षे असे अनेक चित्रपट बनत आहेत ज्यात अभिनेत्रींकरिता खूप चांगल्या संधी मिळतात. लाराला ही बेलबॉटम या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मिळाली होती. ही व्यक्तीरेखा केल्यानंतर लाराचे म्हणणे आहे की तिच्या करिता अजून नवे मार्ग खुले झाले आहेत.
यासंदर्भात बोलताना लारा म्हणाली,’ कलाकार म्हणून हा माझ्या करीअरचा सर्वात चांगला काळ सुरु आहे. मी नेहमीच आपल्या कामात वैविध्यता जपण्याचा प्रयत्न केला आहे. खूप आधी मी जेव्हा नो एंट्रीमध्ये कॉमेडी केली होती तेव्हा प्रेक्षकांसोबत जोडले जाण्याची संधी मिळाली होती. खरेतर अभिनेत्रींना कॉमेडी करण्याची संधी खूप कमी मिळते. तसे पहायला गेले तर माझे कॉमिक टाईिंमग खूप चांगले आहे. याआधी मला केवळ ग्लॅमरशी जोडले जायचे. नो एंट्रीनंतर मला पार्टनर आणि हाऊसफुल सारख्या चित्रपटांत कामेडी करण्याची संधी मिळाली. बेल बॉटममध्ये इंदिरा गांधींच्या भूमिकेत मला कास्ट करण्यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना तब्बल 18 तास लागले. मी मानते की अनुभवाने मॅच्युरिटी मिळते. परंतु वयाच्या 30 व्यावर्षीही मी ती व्यक्तीरेखा तितक्याच गांभीर्याने साकारली असती. खरेतर या वेगळ्या व्यक्तीरेखांनी माझ्याकरिता नवे मार्ग उघडले आहेत. योग्य कामाकरिता आता माझ्याकडे फोन येत आहेत. मेकर्स म्हणतात की आम्ही का नाही विचार केला की तु अशाप्रकारच्या भूमिका साकारु शकते. माझ्याकरिता अभिनेत्री म्हणून हा काळ सर्वात चांगला आहे.’

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …