केंद्र सरकारने दिली संसदेला माहिती
नवी दिल्ली – स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मागील काही दशकांपासून सुरू आहे. महाराष्ट्रापासून स्वतंत्र होत वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. आता केंद्र सरकारने विदर्भ राज्याबाबत संसदेला महत्त्वाची माहिती दिली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली. महाराष्ट्र तोडून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने काही पाऊल उचलले आहे किंवा तसा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर वेगळ्या विदर्भ राज्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्राने सभागृहाला सांगितले. नवीन राज्यांच्या निर्मितीसाठी विविध व्यक्ती आणि संघटनांकडून वेळोवेळी मागणी करण्यात येते, त्यासाठी निवेदन देण्यात येतात. नवीन राज्याच्या निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या संघीय राजकारणावर होतो. नवीन राज्यांच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेत असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यात विदर्भाचा विकास खुंटला असल्याची भावना विदर्भवाद्यांकडून व्यक्त केली जाते. मागील काही दशकांपासून स्वतंत्र विदर्भासाठी अधूनमधून आंदोलने सुरू आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …