वृषभ शहाचा जबरा लूक प्रेक्षकांच्या भेटीस

अभिनेता वृषभ शहा ‘वन फोर थ्री’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील जबरा लूक समोर आला आहे. वृषभ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर भेटीस आले असून, या पोस्टरमध्ये वृषभचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात वृषभची असलेली भूमिका पोस्टर पाहूनच कळत आहे. वृषभचा पोस्टरवरील फोटोतील आक्रोश पाहता त्याने चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचा थोडासा अंदाज बांधता येत आहे. ‘वन फोर थ्री’ चित्रपटात वृषभ अनंता नावाची भूमिका साकारत आहे. राग, द्वेष आणि क्रूरता हे भाव वृषभच्या चेहºयावर स्पष्ट दिसत असून, त्याचा या चित्रपटात दाखवण्यात आलेला खूनशी स्वभाव नक्कीच चित्रपटातील भूमिकेला साजेसा असेल यांत वादच नाही. त्याच्या या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली असून त्याने १० किलो वजन कमी केले आहे. शिवाय त्याने या भूमिकेसाठी स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले आहे. स्वभावाने अजाण असलेल्या वृषभकडून खलनायकाची भूमिका करून घेताना दिग्दर्शक योगेश भोसले यांची उडालेली तारांबळ आणि त्यांची मेहनत लवकरच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेल्या या चित्रपटातील वृषभचा लूक हा तंतोतंत दाक्षिणात्य दिसत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासत वृषभ अभिनय क्षेत्रात उतरला आहे.
‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खºयाखुºया जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. दाक्षिणात्य धाटणीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश भोसले यांनी केले असून, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून दोन बाजू सांभाळल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री शीतल अहिरराव देखील वृषभसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वृषभचा हा जबरदस्त लूक पाहता त्याची नेमकी चित्रपटात भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. करेन तर मामाचीच असे म्हणत अनंता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे आणि अनंताला मामाचीच का करायची आहे हे पाहण्यासाठी आपल्याला
चित्रपटगृहात जावेच लागेल.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …