विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप : आकाश क्वार्टर फायनलमध्ये

बेलग्रेड – भारतीय बॉक्सर आकाश कुमार (५४ किलो)ने रविवारी येथे एआयबीए पुरुष विश्व चॅम्पियनशीपच्या अंतिम १६ मध्ये पुअर्तो रिकोच्या कालेब तिराडोचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये जागा पक्की केली. मागील फेरीत वॉकओवर मिळवणाऱ्या आकाशला तिराडोने कठोर आव्हान दिले, पण पंचांनी सर्वसमंतीने भारतीय बॉक्सरच्या बाजूने निर्णय दिला. त्याने ५-० असा विजय मिळवला. तिराडोने सुरुवातीला आकाशच्या शरीरावर प्रभावशाली ठोसे मारले, पण आकाशने शानदारपणे पलटवार करताना जास्त सटीक ठोसे लावले, ज्यामुळे पंचांचा त्याला पाठिंबा मिळाला. पुअर्तो रिकोच्या खेळाडूला दुसऱ्या फेरीत एक गुणाचा तोटा सहन करावा लागला. त्याला डोके खाली ठेवण्याबाबत इशारा देण्यात आला. भारताच्या १० बॉक्सरने प्री क्वार्टर फायनलमध्ये जागा पक्की केली, ज्यात शनिवारी गोविंद साहनी (४८ किलो)ला पराभवाचा सामना करावा लागला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …