विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप : आकाश सांगवानची विजयी मोहीम

बेलग्रेड – भारतीय बॉक्सर आकाश सांगवान (६७ किलो)ने येथे सुरू असलेल्या एआयबीए पुरुष विश्व चॅम्पियनशीपच्या पहिल्या सामन्यात तुर्कस्थानच्या फुरकान एडमचा ५-० असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. सध्याचा राष्ट्रीय चॅम्पियन फुरकानचा पुढील सामना जर्मनीच्या डॅनियल क्रोटरशी होईल, ज्याला पहिल्या फेरीत बाय मिळाले. भारतीय बॉक्सरने सुरुवातीपासून या सामन्यात दबदबा बनवला होता. त्याआधी रोहित मोर (५७ किलो)ने इक्वाडोरच्या जीन कॅसेडोला ५-० असे नमवलेले. त्याचा पुढील सामना बोस्निया हर्जेगोविनच्या एलन राहिमिचशी होणार आहे. आशियाई चॅम्पियन संजीत (९२ किलो) व सचिन कुमार (८० किलो) यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. सचिन ३० ऑक्टोबरला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या रॉबी गोंजालेज, तर संचीत २९ ऑक्टोबरला रशियाच्या आंद्रे स्तोकीचा सामना करेल. या चॅम्पियनशीपमध्ये १०० देशांचे ६०० पेक्षा जास्त बॉक्सर भाग घेतील. काही वजनी गटातील बॉक्सर्सना क्वार्टर फायनलमध्ये पोहण्यासाठी कमीत कमी तीन सामने जिंकावे लागतील. त्यात भारताचा शिव थापा (६३.५ किलो) याचा समावेश आहे, जो पहिल्या सामन्यात केनियाच्या विक्टर ओडियाम्बो न्याडेराशी भिडेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …