ठळक बातम्या

विश्व टूर फायनल्समध्ये पात्र ठरणारा युवा भारतीय बनण्यास लक्ष्य सेन सज्ज

नवी दिल्ली – सत्रातील अंतिम एचएसबीसी बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्समध्ये पात्र ठरणाऱ्या देशाचा (भारत) युवा बॅडमिंटन खेळाडू बनण्यासाठी भारताचा लक्ष्य सेन सज्ज झाला आहे. एचएसबीसी बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्सचे १ डिसेंबरला इंडोनेशियामधील बालीमध्ये आयोजन केले जाणार आहे. अलमोडाचा २० वर्षीय लक्ष्य सेनची बीडब्ल्यूएफ विश्व टूरमधील कामगिरी प्रभावशाली राहिली आहे. तो सध्या विश्व टूर क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. तो विश्व टूर फायनल्स पुरुष एकेरी स्पर्धांमध्ये किदाम्बी श्रीकांत (तिसरी क्रमवारी) सोबत असेल. या स्पर्धेमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती ठरलेली पी. व्ही. सिंधू (चौथे स्थान) महिला एकेरीमध्ये तर अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी (सहावे स्थान) महिला दुहेरीतील जोडी भाग घेणार आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर ही टुर्नामेंट ग्वांग्झू ऐवजी बालीमध्ये खेळविली जाणार आहे. श्रीकांत, समीर वर्मा, सिंधू आणि लंडन कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हे खेळाडू पहिल्या सत्राच्या अंतिम टूर्नामेंटमध्ये खेळले आहेत. २०१८ मध्ये बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स जिंकणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. सायना नेहवाल २०११ मध्ये बीडब्ल्यूएफ सुपरसीरिज फायनल्सच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. श्रीकांत आणि समीर नॉकआऊट स्तरापर्यंत पोहोचले होते, परंतु ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. लक्ष्य सेनने कोरोनामुळे निलंबित आंतरराष्ट्रीय सर्किटआधी २०१९ मध्ये पाच किताब मिळविले होते. तो दुबई ओपनमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आणि डेनमार्क मास्टर्स व हायलो ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. इंडोनेशियन स्तरावर लक्ष्य सेन ड्रॉमध्ये फार पुढे जाऊ शकला नाही. तो दोन वेळा सवार्ेच्च स्थानी असलेल्या आणि दोन वेळचा विश्व विजेता जपानचा केंटो मोमोटा याच्याकडून पराभूत झाला होता. विश्व टूर फायनलसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची अधिकृ त यादी बालीमध्ये सुरू असलेली इंडोनेशिया ओपन सुपर १००० टूर्नामेंट संपल्यानंतर जाहीर केली जाणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …