नवी दिल्ली – आगामी विश्वचषकावर भारतीय संघाला नाव कोरायचे असेल, तर संघात अष्टपैलू खेळाडू हवेत, असे मत क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संघाने १९८३ मधील विश्वचषक कोणत्या घटकांवर आणि कोणत्या परिस्थितीत जिंकला याबाबत त्यांनी म्हटले की, आमच्या संघात चौदा खेळाडू आणि एक व्यवस्थापक होते. त्यावेळी क्षेत्ररक्षणासंबंधी नियम नव्हते. त्याचप्रमाणे एका षटकात किती बाऊंसर्स टाकण्यावर मर्यादा नव्हती. इंग्लंडमधील थंड वातावरणात लाल रंगाचा चेंडू जुना झाला, तरी हवेत चांगलाच स्विंग होत असे, तरीही भारतीय संघाने अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून विश्वचषक पटकावला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा अधिक होता. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करत असे. २००७ आणि २०११ सालीही भारतीय संघाने टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकले, कारण त्या संघांमध्येही अष्टपैलू खेळाडूंची संख्या अधिक होती. आताच्या भारतीय संघात मात्र अष्टपैलू खेळाडूंचा अभाव दिसतो. हार्दिक पंड्या तंदुरुस्त नाही आणि त्यामुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले आहेत. शार्दुल ठाकूरने अलीकडील काही सामन्यांत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. व्यंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला प्रभाव पाडला आहे; पण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापि संधी मिळालेली नाही. भारतीय संघाला जर आगामी दोन विश्वचषक स्पर्धांपैकी एक स्पर्धा जिंकायची असेल, तर संघात अष्टपैलू खेळाडंूची संख्या महत्त्वाची आहे, असे गावसकरांना वाटते.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …