बॉलीवूडमध्ये आपल्या बेधडक आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना राणावतला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आधी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्याच जोडीला कंगनाचे अनेक आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यावरून कंगना आपल्या करिअरमध्ये आणखी एक उंच भरारी घेणार असल्याचे स्पष्ट होतेये. खरेतर चाहते हे जाणून घेण्यासाठीही तितकेच उत्सुक आहेत की, कंगना कधी संसाराला लागणार आणि कधी तिची मुले बाळे होणार? अलीकडेच या संदर्भात तिला एका मुलाखतीत प्रश्न केला असता कंगनाने आपले विचार मांडले.
कंगनाने सांगितले की, ती येत्या ५ वर्षांमध्ये स्वत:ला विवाहित महिलेच्या रूपात पाहते आणि मुले व्हावीत असेही तिला वाटते. त्याचबरोबर तिने सांगितले की, सध्या ती आयुष्याच्या ज्या वळणावर आहे तेथे ती खूश आहे. लवकरच ती आपल्या पार्टनरविषयी देखील गुजगोष्टी करणार आहे. मला स्वत:ला पुढील ५ वर्षांनंतर एक आई आणि पत्नीच्या रूपात पाहायची इच्छा आहे. एका अशा व्यक्तीसोबत ज्याचा नव्या भारताविषयी एक वेगळा दृष्टिकोन असेल. कंगना पुढे म्हणाली की, ती विवाह करण्याच्या आणि आई बनण्याच्या प्रयत्नात आहे. आपला पार्टनर कोण आहे याबद्दलही ती लवकरच सांगेन, असेही तिने म्हटले आहे.