विराट-बीसीसीआय वादात भोगलेंनी घेतले द्रविडचे नाव

मुंबई – विराट कोहलीच्या स्फोटक पत्रकार परिषदेचे पडसाद अद्याप उमटत आहेत. टीम इंडियाच्या क र्णधार पदाबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेले वक्तव्य विराटने खोडून काढले. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हर्षा भोगले यांनी या प्रकरणात ट्विट्स करीत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या ट्विट्समध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे नाव घेतले आहे.
हर्षा भोगलेंनी ट्विट करीत म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांमधील या विषयाला दोन व्यक्तींमधील वाद असे पाहिले जाऊ नये. हा वाद सार्वजनिक होण्याऐवजी खासगी पद्धतीने सोडवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी संवाद आवश्यक आहे. राहुल द्रविडसाठी ही विचित्र परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये त्याच्या व्यवस्थापन कौशल्याची परीक्षा होणार आहे. कारण, दक्षिण आफ्रिकेत जिंकण्यासाठी टीम इंडियाला आनंदी आणि सकारात्मक क र्णधार तसेच सर्वश्रेष्ठ फलंदाजाची गरज आहे. हा वाद दोन्ही गटांसाठी हानिकारक आहे. भारतीय क्रिकेट टीमला मजबूत व्हावे लागेल. आपल्याला पूर्ण सत्य माहिती नसेल तर सार्वजनिक व्यासपीठावर निष्कर्ष काढणे हे धोकादायक आहे. हे मी अनुभवातून सांगतो, असे हर्षा भोगले म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …