मुंबई – विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आल्यापासून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. या प्रकरणात आठवडाभर वेगवेगळी चर्चा सुरू होती. त्यानंतर विराटने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचा खुलासा केला. विराटच्या स्पष्टीकरणानंतरही ही चर्चा संपलेली नाही. विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून का हटवण्यात आले? याचे कारण टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे.
विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गावस्करांनी विराटची चूक कुठे झाली हे सांगितले आहे. मी त्याने टी-२० टीमचे कर्णधारपद सोडताना केलेले वक्तव्य वाचले. त्यामध्ये त्याने लिहिलेली एक ओळ कदाचित बीसीसीआयमध्ये सत्तेवर असलेल्या मंडळींना आवडली नसावी. त्याने मी एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधार पद सांभाळेल असे लिहिले होते. माझ्या मते त्याने मी एकदिवसीय आणि कसोटी टीमसाठी उपलब्ध असेल असे लिहायला हवे होते, असे गावस्कर म्हणाले. निवड समितीने विराटला त्याला हटवण्याबाबतची कल्पना दिली होती. त्यामुळे या प्रकरणावर आता वाद होण्याची गरज नाही. विराटला मीडियातून समजले असते तर ते चुकीचे ठरले असते. खेळाडूंनी या सर्व वादापासून दूर राहावे असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …