केपटाऊन – विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच झाला, तेव्हा विराट नाबाद १५ धावांवर खेळत होता. तेव्हाच त्याने दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये ६२६ धावा पूर्ण केल्या. तो आता दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटने भारताचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले आहे. आता विराटच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे.
विराटने दक्षिण आफ्रिकेमध्ये सात कसोट्यांच्या १३ डावांमध्ये ५२च्या सरासरीने ६२६ धावा केल्या. यात दोन शतकेआणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. १५३ धावा ही त्याची दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक धावसंख्या आहे. राहुल द्रविडने २२ डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ६२४ धावा केल्या आहेत. फक्त तीनच भारतीय खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत ६०० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. २०१९ नंतर विराटला शतक करता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात मोठी खेळी करण्यासाठी विराट आग्रही असेल. राहुल द्रविडचा मंगळवारी (११ जानेवारी) वाढदिवसही होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक रन करणारा भारतीय सचिन तेंडुलकर आहे. सचिनने १५ कसोट्यांच्या २८ डावांमध्ये ४६च्या सरासरीने ११६१ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला एक हजार धावांपेक्षा जास्त स्कोअर करता आला नाही. सचिनच्या नावावर दक्षिण आफ्रिकेत पाच शतके आणि तीन अर्धशतके आहेत. १६९ धावा हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …