विराटच्या नजरा अखेरचा किल्ला जिंकण्यावर

  • योग्य नियोजन असेल भारतासाठी आव्हान

सेंच्युरियन – ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला त्यांच्याच खेळपट्टीवर धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आपली पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी वचनबद्ध भारतीय संघासमोर रविवारी येथे ‘बॉक्सिंग डे’ ने सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी योग्य नियोजनासह मैदानात उतरण्याचे मोठे आव्हान असेल.
कर्णधार विराट कोहलीसमोर पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या रूपात कमी अनुभवी श्रेयस अय्यर व अनुभवी पण खराब फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणे पैकी एकाची निवड करण्याचा प्रश्न उभा ठाकला असेल. एवढेच नाही तर पाचव्या गोलंदाजाच्या रूपात शार्दुल ठाकूर वा इशांत शर्मा यांच्यापैकी एखाद्याची निवड करताना डोकेदुखी ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने रहाणे व इशांतला जायबंद सांगत संघाबाहेर केले, पण जर रविवारी हे अंतिम संघात स्थान मिळवत नाहीत, तर असे समजले जाईल की, त्यांना बाहेर करण्यात आले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला दौरा १९९२ मध्ये केला होता, पण अद्याप येथे ते कसोटी मालिका जिंकू शकलेले नाही. अशात कोहली हे यश प्राप्त करणारा पहिला कर्णधार बनण्यासाठी सर्व बाजूने जोर लावेल. दक्षिण आफ्रिका आता पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाप्रमाणे बळकट राहिलेली नाही, कारण मागील काही वर्षांत ते परिवर्तनच्या काळातून जात आहेत. ते पाहता कोहली व त्याच्या संघासाठी ही सर्वोत्तम संधी मानली जात आहे. भारतीय संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघापेक्षा सर्वोत्तम दिसत आहे. जर ते मैदानात स्वत:ला सिद्ध करतात, तर ते पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्यास यशस्वी होतील. भारतीय संघ खासकरून कोहलीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे व तो अविस्मरणीय कामगिरी करण्यास वचनबद्ध असेल. कोहली या संघाविरुद्ध आपला दबदबा बनवण्याचा प्रयत्न करेल, ज्यांचे फक्त दोनच खेळाडू कर्णधार डीन एल्गर (६९ कसोटी) व यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक (५३ कसोटी) यांच्याकडेच ५० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. भारतासाठी चांगली बातमी अशी की, कॅगिसो रबाडाला साथ देण्यासाठी जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक एनरिच नॉर्जे अनुपस्थित आहे. जिथपर्यंत भारतीय फलंदाजांचा प्रश्न आहे, तर त्यांना डावखुरा फिरकीपटू केशव महाराजबाबत जास्त चिंता नसेल. कोहली देखील येथे मोठी खेळी करू पाहील, कारण त्याने २०१९ पासून कोणतेच आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही. या काळात त्यांची सरासरी ३० पेक्षा कमी देखील राहिली.

कोहलीने दौरा सुरू होण्याआधी बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधत नवी चर्चा सुरू केली होती, पण जी लोक कोहलीला जाणतात, त्यांना माहीत आहे की, अशाप्रकारच्या घटनांनी भारतीय कर्णधार चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित होतो. कोहलीने नेट सत्रात चांगला फॉर्म दाखवला. सोबतच त्याची इच्छा असेल की, उपकर्णधार के. एल. राहुलने इंग्लंडमधील आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी व चेतेश्वर पुजाराने देखील मोठी धावसंख्या रचावी. पाचव्या क्रमांकासाठी रहाणेवर अय्यरचे पारडे जड दिसत आहे, पण येथे त्याला डुआने ऑलिवरसारख्या गोलंदाजांच्या गुडलेंग्थ गोलंदाजीचा सामना करायचा आहे. सेंच्युरियनची खेळपट्टी देखील सामना पुढे जाईल तशी गती पकडते. ऋषभ पंतदेखील विषम परिस्थितीत चांगली कामगिरी करतो. जर तो फिरकीपटू महाराजवर षटकार ठोकतो, तर कर्णधार कोहलीला देखील कोणतीच अडचण नसेल. भारतीय फलंदाजांना दरम्यान रबाडा व डुआनेपासून सतर्क राहावे लागेल. जसप्रीत बुमराह आपल्या वेगवान गोलंदाजीने दोन्ही संघांमध्ये अंतर निर्माण करू शकतो. तर विश्रांतीनंतर पुनरागमन करणारा एल्गर, तेंबा बावुमा व डिकॉकसारख्या फलंदाजांची कठोर परीक्षा घेण्यास बुमराह सज्ज असेल. जर बुमराह व मोहम्मद शमी पहिल्या फळीवर वरचढ ठरतात तर दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाजांसाठी रविचंद्रन अश्विनचा सामना करणे सोपे नसेल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …