तुम्ही असे अनेक चित्रपट पाहिले असतील, ज्यात पती किंवा पत्नी स्वत:चा विमा काढतात आणि नॉमिनी म्हणून आपल्या जोडीदाराचे नाव देतात. मग पैशांच्या लोभापायी जोडीदार इतका खाली पडतो की, तो जोडीदाराचा खून करून पैसे हडप करतो. ही केवळ एक फिल्मी कथा वाटत असून, ती अनेक हिंदी चित्रपटांची थीम बनली आहे. अलीकडेच खºया आयुष्यातही अशीच एक घटना घडली आहे. अमेरिकेत राहणाºया एका जोडप्याने नुकताच विमा काढला. पैसे हडप करण्यासाठी पतीने पत्नीची हत्या केली.
टेक्सासमध्ये राहणारा ४१ वर्षीय ख्रिस्तोफर कॉलिन्स आणि त्याची पत्नी युआन हुआ लिआंग यांनी नुकतीच त्यांच्या नावे १.४ कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली, परंतु पॉलिसीवर स्वाक्षरी केल्याच्या २ दिवसांच्या आत, पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला. घरात घुसलेल्या काही चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांना वारंवार सांगूनही संशय पती ख्रिस्तोफरवर पोलिसांनी घेतला.
त्या माणसाने सांगितलेली कथा खूपच फिल्मी आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, तो एकेदिवशी जिममध्ये गेला होता, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला फोन केला आणि घरात कोणीतरी घुसल्याचे सांगितले. ख्रिस्तोफरचा दावा आहे की, त्याने एका माणसाचा आवाजदेखील ऐकला आहे. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला, पण इमर्जन्सी नंबरऐवजी त्याने नॉर्मल कॉल केला होता. त्यानंतर ख्रिस्तोफरने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला आणि घरी जाऊन तपास करण्यास सांगितले. युआनला पाहण्यासाठी पोलीस घरी गेले असता त्यांना ती मृत दिसली. ख्रिस्तोफर घरी पोहोचताच त्याने पत्नीचा मृतदेह पाहिला आणि बॅग फेकून मृतदेहाकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर फोडून आत प्रवेश केल्याचा कोणताही सुगावा मिळालेला नाही. घराचा मागचा दरवाजा उघडा होता.
या प्रकरणानंतर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ख्रिस्तोफरने युआनच्या डोक्यात थेट गोळी झाडल्याचा दावा कोर्टात वकिलाने केला आहे. दाव्यानुसार, हे संपूर्ण प्रकरण विमा पॉलिसीचे पैसे हडपण्याचे आहे, कारण शेवटी ते पैसे पतीलाच मिळणार होते. युआनचा मृतदेह सापडला. त्यादिवशी शेजाºयांनी पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे ऐकले होते. अहवालानुसार, महिलेची ०.२२ किंवा ०.२५ कॅलिबर बुलेटने हत्या करण्यात आली होती आणि तिच्या पतीच्या तपासादरम्यान, त्याच्या खिशात ०.२२ कॅलिबरच्या बुलेटचे शेल सापडले होते. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.