विनोद कांबळीने दिला रहाणे, पंतला कानमंत्र

मुंबई – दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत या दोघांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने कानमंत्र दिला आहे. सध्या सरावादरम्यानचे तिघांचे फोटो व्हायरल होत आहेत. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ गुरुवारी (१६ डिसेंबर) चार्टर फ्लाइटने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. तत्पूर्वी, मुंबईत संघाला क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, विनोद कांबळीने रहाणे आणि पंतसोबतचे काही फोटो शेअर केले. यावेळी त्याचा मुलगा क्रिस्टियानोदेखील उपस्थित होता. हे फोटो शेअर करताना कांबळीने कॅप्शनदेखील दिली आहे. आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी अजिंक्य आणि ऋषभ यांना ट्रेनिंगमध्ये मदत केल्यामुळे आनंद झाला. यावेळी त्यांना काही मौलिक सल्ले दिले आहेत. माझ्याकडून दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी दोघांना शुभेच्छा! असे कांबळीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंजिक्य रहाणे खराब फॉर्ममधून जात आहे. रहाणेने यापूर्वीच उपकर्णधारपद गमावले आहे, मात्र रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. विराट कोहलीचा उपकर्णधार कोण असेल हे बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. सुरुवातीला रमाकांत आचरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते शारदाश्रम शाळेकडून खेळले होते. पुढे मुंबई आणि भारतीय संघामध्येही ते एकत्र खेळले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …