विनित कुमार सिंगने बांधली लग्नगाठ

बॉलीवूड अभिनेता विनित कुमार सिंग हा आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड रुचिरा गोरमरेसोबत विवाह बंधनात अडकला आहे. त्याने आपल्या पत्नीसोबतचा विवाह सोहळ्याचा पहिला फोटो शेअर करून चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. त्याचा विवाह सोहळा २९ नोव्हेंबर रोजी पार पडला होता.

विनितने विवाहाचे दोन फोटो शेअर करत एक छान रोमँटिक नोट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे, तुझा हात धरून मी इतक्या दूरवर आलोय. तुला माझ्या आयुष्यात पाहून मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. विनितच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय चाहत्यांनीही या नवदाम्पत्याला विवाहाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …